IND vs PAK Reserve Day : भारत-पाकिस्तान मॅचमध्ये (PAK vs IND) पावसाने घोटाळा केल्याने आता उर्वरित सामना उद्या म्हणजे 'रिझर्व्ह डे' ला खेळवला जाणार आहे. पहिल्या दिवशी पावसाची परिस्थिती (Persistent Rains) पाहता आता दुसऱ्या दिवशी (Reserve Day) सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता 11 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता दोन्ही संघ आमने सामने आल्याचं पहायला मिळू शकेल. त्यामुळे आता क्रिडाप्रेमींच्या आशा कायम आहेत. उद्या सामना नियमित वेळेत सुरू होणार आहे. टीम इंडिया 25 व्या ओव्हरपासून खेळण्यास सुरूवात करेल. तर मैदानात विराट कोहली अन् केएल राहुल उतरतील.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये पाऊस थांबला होता. कव्हर हटवण्यात आले होते. मात्र, सामना सुरू होण्याआधीच पावसाची पुन्हा एन्ट्री झाली अन् पुन्हा मैदानात कव्हर्स आणावे लागले. त्यामुळे आता रिझर्व्ह दिवशी सामना होईल, असं सांगण्यात आलं आहे. टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 147 धावा मैदानात केल्या आहेत. केएल राहुल 17 धावा अन् विराट कोहली 8 धावांवर खेळतोय.



टॉस जिंकून पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारताच्या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजांना फोडून काढलं. शुभमन गिलने दमदार सुरूवात केली. त्याने सुरूवातीपासून चौकाराचा पाऊस पाडला. त्यानंतर रोहितने घेर बदलले अन् त्याने चार सुंदर षटकार खेचत टीम इंडियाला 100 पार केलं. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने 121 धावांची भागेदारी केलीये. मात्र, रोहित शर्मा बाद होताच शुभमन देखील विकेट गमावून बसला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली अन् केएल राहुल यांच्या जोडीने सावध धावसंख्या खेचली. त्यानंतर आता 24 ओव्हरनंतर टीम इंडियाचा स्कोर 147 झाला आहे. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी अन् शादाब खान यांनी 1-1 विकेट घेतलीये.


आणखी वाचा - PAK vs IND : ना तुला ना मला... रिझवानने दिला पाकिस्तानला धोका, असं काही केलं की... पाहा Video


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ.