Ramiz Raja : एशिया कप 2023 स्पर्धेच्या आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड  (PCB) चांगलंच बिथरल्याचं दिसून आलं होतं. एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात (Pakistan) जाणार नसल्याचं भारतीय क्रिकेट बोर्डाचे  (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांनी स्पष्ट केलंय. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही (PCB) पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup) न खेळण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघाला (BCCI) पाकिस्तान यायचं नसेल तर त्यांनी येऊ नये, मात्र, एशिया कप स्पर्धा पाकिस्तानात खेळवण्यात आली नाही तर या स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघ (PCB) बाहेर पडेल, अशी धमकी पीसीबीने बीसीसीआयला दिली होती. त्यानंतर आता रमीझ राजा यांनी आयसीसीकडे (ICC) विनंती केल्याचं पहायला मिळतंय.


काय म्हणाले रमीझ राजा ?


सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान सरकारने पाकिस्तानला भारतात जाण्याची परवानगी दिली नाही तर काय होईल? हा वाद बीसीसीआयनेच सुरू केला होता. याचं उत्तर आम्हाला द्यावं लागलं. कसोटी क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची अत्यावश्यक गरज आहे. वर्ल्ड कपच्या (World Cup) सामन्यादरम्यान 90 हजार चाहते एमसीजीमध्ये आल्याचं तुम्ही पाहिलंय. मी आयसीसीबद्दल थोडा निराश आहे. त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती देखील रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी केली आहे.


आणखी वाचा - BCCI निर्णयावर Sunil Gavaskar चांगलेच भडकले, म्हणाले "तुम्ही त्याचं टॅलेंट खराब करताय..."


दरम्यान, मी नेहमी म्हणत आलोय की, पाकिस्तान क्रिकेटची अर्थव्यवस्था सुधारण्याची गरज आहे आणि आपण चांगली कामगिरी केली तरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगला पैसा कमवू शकतो, असंही रमीझा राजा यांनी म्हटलं होतं. रमीझ राजा यांनी बीसीसीआयच्या अर्थव्यवस्थेवरून नेहमीच गरळ ओकल्याचं दिसून येतं. त्यानंतर आता पुन्हा पाकिस्तानला पैश्यांची हुक्की आल्याचं दिसतंय.