मेलबर्न : मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगला होता. अखेर या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 4 विकेट्स राखून पराभव केला. या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते विराट कोहली आणि हार्दिक पंड्या. या सामन्याचे अनेक क्षण सोशल मीडियावर व्हायरलही झाले. दरम्यान यामध्ये एक क्षण असाही होता जेव्हा एका भारतीयाने स्टेडियममध्ये एका पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल केलं. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा दावा केला जातोय की, हा व्हिडिओ 23 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्याचा आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान एक पाकिस्तानी फॅन झेंडा फडकावत होता. मात्र हा झेंडा उलटा होता. यावेळी एका भारतीय प्रेक्षकाने त्या व्यक्तीला ध्वज उलटा धरल्याची वारंवार माहिती दिली. मुख्य म्हणजे त्या ठिकाणी एवढी गर्दी आणि आवाज होता ज्यामुळे त्याला ऐकू येत नव्हतं. मात्र पुन्हा पुन्हा हाक मारल्यावर त्याच्या ही गोष्ट लक्षात आली.


दरम्यान पाकिस्तानी चाहत्याने आपला झेंडा उंचावताच भारतीय चाहते हसायला लागले. यावरून ट्रोल करत म्हणाले...आणि यांना त्यांना काश्मीर हवंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतक्या झपाट्याने व्हायरल झाला आणि लोकांनी पाकिस्तानी फॅन्सचा आनंद लुटला. लोकांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, पहिलंच पाकिस्तानची इतकी वाईट स्थिती झालीये त्यामध्येच अशा गोष्टी पाहायला मिळतायत. 



मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 159 रन्स केले, भारताने शेवटच्या बॉलपर्यंत सामना खेचत हे लक्ष्य गाठलं.


टीम इंडियासाठी विराट कोहलीने नाबाद 82 रन्स केले. या सामन्यात 31 रन्सवर भारताने 4 विकेट गमावल्या होत्या, पण विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या भक्कम भागीदारीने टीम इंडियाला पराभवापासून वाचवलं. टीम इंडियाला ग्रुप स्टेजवर अजून चार सामने खेळायचेत.