IND vs PAK: रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग XI
रोहित शर्माने जिंकला टॉस, दोन्ही संघाच्या प्लेइंग XI मध्ये `हा` असेल बदल
पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज भारत- पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याचे टॉस टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला आहे, तर पाकिस्तान प्रथम बॅटींग करणार आहे. आता प्रथम बॅटींग करून पाकिस्तान टीम इंडियासमोर किती धावांचे लक्ष्य ठेवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ind vs pak t20 world cup melbourne weather report team india won the toss chose feilding pakistan bat first rohit sharma vs babar azam)
हे ही वाचा : दिनेश कार्तिक की ऋषभ पंत? प्लेइंग XI मध्ये कोणाला मिळाली संधी?
टॉस जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्मा म्हणाला, आम्ही प्रथम फिल्डींग करू. खेळपट्टी चांगली दिसत आहे. ढगाळ वातावरणात बॉलिंग करणे केव्हाही चांगले. मला वाटते की बॉल थोडा स्विंग होईल आणि आम्हाला त्याचा फायदा घेणे आवश्यक आहे, असे तो म्हणालाय. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, टॉस आमच्या हातात नाही, पण आम्हालाही प्रथम बॉलिंग करायची होती.
भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण मेलबर्नमधील आकाश आता स्वच्छ आहे आणि पूर्ण 40 ओव्हर्सचा खेळ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवातून टीम इंडिया सावरू शकली नाही आणि स्पर्धेतून बाहेर पडली. आता भारतीय संघाला पाकिस्तानकडून या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, हैदर अली, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, आसिफ अली, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.