India vs Pakistan T2o WC Match Tickets: भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणारा क्रिकेटचा सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. मागील अनेक वर्षांपासून हे दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळलेले नाही. सीमेवरील तणाव आणि राजकीय मतभेदांमुळे दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धा वगळता इतर स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. त्यामुळेच या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धांमधील सामने हे तुलनेनं दुर्मिळ असल्याने अशा सामन्यांची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. त्यामुळेच या सामन्यांच्या तिकीटांची किंमतही सर्वसामान्यांच्या बजेटबाहेरच असते. असेच काहीसे घडणार आहे यंदा 9 जून रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप सामन्यासंदर्भात. रिसेल बाजारांमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान वर्ल्डकप स्पर्धेत होणाऱ्या या टी-20 सामन्याच्या तिकीटांची रिलेस मार्केटमधील किंमत थक्क करणारी आहे.


497 वरुन थेट 41 लाख रुपयांपर्यंत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकृत तिकीट विक्रीमध्ये भारत पाकिस्तान सामन्याचं एक तिकीट 6 अमेरिकी डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 497 रुपयांना आहे. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये प्रीमियम चेअर्ससाठी सर्वाधिक पैसे मोजावे लागणार आहेत. प्रीमियम ठिकाणचं तिकट टॅक्स वगळता 400 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 33 हजार 148 रुपये इतकं आहे. स्टबहब आणि सीटगीकसारख्या प्लॅटफॉर्मवर तिकींटाची किंमत फारच अधिक आहे. ज्या तिकीटांची किंमत 400 अमेरिकी डॉलर्सला होती त्यांची किंमत रिसेल मार्केटमध्ये तब्बल 40 हजार अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच एक तिकीट जवळपास 33 लाखांना आहे. यावरील प्लॅटफॉर्म फीचाही विचार केला तर एकूण किंमत 50 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच एकूण 41 लाखांपर्यंत पोहोचते.


सगळे विक्रम मोडले


'युएसए टु़डे'च्या वृत्तानुसार, सुपर बाउल 58 च्या तिकीटची सेकेंडरी मार्केटमधील किंमत 9000 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. तर एनबीएच्या अंतिम सामन्यात कोर्टाजवळच्या सीटचं तिकीट 24 हजार अमेरिकी डॉलर इतकं होतं. मात्र या किंमती सामन्य वाटतील एवढी मागणी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सीटगीक प्लॅटफॉर्मवर मिळत आहे. इथं भारत पाकिस्तान सामन्याचं एक तिकीट सर्वाधिक 1 लाख 75 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 1.4 कोटी रुपये इतकं आहे. यात कर आणि प्लॅटफॉर्म शुल्काचा विचार केल्यास एकूण किंमत 1.86 कोटी रुपये इतकी होते. ही रक्कम एवढी आहे की मुंबईतील घाटकोपरपासून पुढील भागात या किंमतीत एक 2 बेडरुम किचन हॉलचं घर सहज विकत घेता येईल.


रोहित कॅप्टन


अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी होणाऱ्या या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माच करणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट झालं आहे. मात्र या संघामध्ये कोणाकोणाला संधी दिली जाईल याबद्दल अद्यापही संभ्रम कायम असल्याचं दिसतंय. विराट कोहली आणि रोहित शर्माचा हा कोणत्याही फॉरमॅटमधील शेवटचा वर्ल्डकप असेल अशीही चर्चा आहे.