Asia cup 2022: आजचा दिवस भारतीय क्रिकेट रसिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात भिडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर फोरला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आणि हॉगकाँगला नमवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मनोबल उंचावले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी संघ देखील जोमात आहे.


भारताविरोधात पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला असला तरी; हॉगकाँगला नमवल्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास देखील दुनावला आहे.


त्यामुळे आजचा रविवार भारतीय क्रिकेट प्रेमीसाठी स्पेशल आणि उत्कंटा वाढवणारा ठरणार हे नक्की... 


सुपर फोरमध्ये कोणत्या संघांना मिळालंय स्थान


सुपर फोरमध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्थान आणि पाकिस्तान या चा संघांना स्थान मिळालं आहे. गेल्या रविवारी भारताने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला होता. आणि टी -२० वर्ल्डकपमधल्या पराभवाचा बदला घेतला होता. त्यामुळे हा रविवार देखील तितकाच हायहोल्टेज ठरणार आहे. कारण पाकिस्तान सुद्धा पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरून कडवी झुंज देईल यात शंका नाही तर भारत सुद्धा आपली विजयी घोडदौड सुरुच ठेवण्याच्या प्रयत्नात असेल

भारताच्या टॉप ऑर्डरकडून मोठ्या अपेक्षा....


भारताच्या टॉप ऑर्डकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात टॉप ऑर्डर तितकी चमकदार कामगिरी करु शकला नाही. मात्र आजच्या सामन्यात सलामीच्या फलंदाजांना सावध सुरुवात करुन भक्कम पार्टरशिपची करावी लागणार आहे. भक्कम पार्टरशिपच्या जोरावरच भारतीय संघाल विजयाची गवसणी घालता येणार आहे. जर सलामीचे फलंदाज अपयशी ठरले तर मधल्या फळीवर दबाव वाढणार हे नक्की


(asia cup 2022 super 4 round ind vs pak team india vs pakistan face again in 1 week head to head records rohit sharma babar azam)