IND VS PAK : हार्दिक-विराटची झुंज, पाकिस्तानच्या जबड्यातून असा हिसकावला विजय
India vs pakistan : टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. विराट कोहली ठरला हिरो.
IND vs PAK: T20 world cup 2022 मधील सुपर-12 च्या पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानला (Pakistan loss) फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हा ऐतिहासिक सामना रंगला. पाकिस्तानच्या संघाने 160 धावाचं आव्हान भारतापुढे ठेवलं होतं. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली, पण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराट कोहली (Hardik and virat partnership) यांनी झुंज देत पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.
टीम इंडियाने 364 दिवसांनंतर पाकिस्तानकडून पराभवाचा बदला घेतला आहे. गेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अर्शदीप सिंगने पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले. अन विराट कोहलीने पाकिस्तानच्या बॉलर्सवर फटकेबाजी केली.
पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद (51) आणि शान मसूद यांनी चांगली खेळी केली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे पाकिस्तान संघ मजबूत स्थितीत आला. यानंतर पुन्हा एकदा 13व्या षटकात मोहम्मद शमीने अहमदला बाद केले.
भारतीय संघाकडून विराट कोहलीने 53 बॉलमध्ये 82 रनची शानदार खेळी केली. तर हार्दिक पंड्याने 37 बॉलमध्ये 40 रन केले. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना गेला. शेवटच्या बॉलमध्ये भारतीय संघाला 1 रनची गरज होती. अश्विनने शेवटच्या ओव्हरवर फोर मारला.
19 व्या ओव्हरमध्ये 15 रन तर 16 व्या ओव्हरमध्ये 16 रन आले. त्यामुळे विजयाचा मार्ग सुखर झाला.