मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीमधली सर्वात रोमांचक मॅच रविवारी दुपारी ३.०० वाजल्यापासून खेळली जाणार आहे. बर्मिंघममध्ये होणाऱ्या या मॅचसाठी दोन्ही टीम्स सज्ज झाल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा एक वेगळीच क्रेझ क्रिकेट चाहत्यांत दिसून येते. स्टेडियम खचाखच भरलेले असतात. लोकांच्या नजरा टीव्ही स्क्रीनवरून हटत नाहीत... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही तशीच क्रेझ सध्या पाहायला मिळतेय... आणि अशावेळी सचिनचा 'तो' शानदार सिक्सर प्रेक्षकांना न आठवला तरच नवल... 


२००३ मध्ये सेन्चुरियन मैदानावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान वर्ल्डकपचा महत्त्वाचा सामना खेळला गेला होता. या सामन्यात सचिननं शोएब अख्तरच्या एका बॉलवर ठोकलेला सिक्सर क्रिकेटमधला एक ऐतिहासिक क्षण ठरलाय. 


वसीम अकरम, वकार युनिस आणि शोएब अख्तर यांसारख्या बॉर्लससोबत मैदानात उत्तरलेली पाक टीम सुरुवातीपासूनच दबाव बनवण्यात अपयशी ठरली होता. २७४ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना सचिननं वसीम अकरमच्या काही बॉल्सला चांगलंच फटकावलं होतं. त्यानंतर शोएब बॉलिंगसाठी आला... आणि त्यानंतर मैदानात जे घडलं त्याला विरेंद्र सेहवागनं म्हटलं होतं... 'बाप बाप होता है, बेटा बेटा होता है'


पाहा, हाच तो क्षण...