लखनऊ : टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेय एकना क्रिकेट स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) हा सामना होणार आहे. मात्र स्टेडीअममध्ये पडत असलेल्या पावसामुळे दोनदा टॉस लांबण्यात आला होता. त्यामुळे आता ओव्हर्सही घटवण्यात आल्या असून 3 वाजता सामना सुरु होणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊमध्ये पावसामुळे दोनदा टॉस होऊ शकला नाही आहे. त्यामुळे आता या सामन्यात 5 ओव्हर कमी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आता दोन्ही संघ45-45 ओव्हरचा सामना खेळणार आहेत. हा सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक दुपारी 2.45 वाजता होईल.


आणखी वाचा : पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना


लखनऊमध्ये 96 टक्के पावसाची शक्यता 
Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये गुरुवारी हवामान खूपच खराब असणार आहे.दिवसभर पावसाची शक्यता 96 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजेच अधूनमधून पाऊस पडत राहील. तसेच दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यताही 94 टक्क्यांपर्यंत आहे. या अर्थाने, सूर्यप्रकाश देखील दिसणार नाही. त्यामुळे अशा स्थितीत सामना होणे फार कठीण वाटते. 


दोन्ही संघ 
टीम इंडिया : शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (डब्ल्यूके), संजू सॅमसन (डब्ल्यूके), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.


दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे आणि तबरेझ शाम्सी