Virat Kohli | कॅप्टन्सी गेली पण तापटपणा कायम, विराट आता कोणासोबत भिडला?
विराट कोहली (Virat Kohli) जितका त्याच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो.
पार्ल | विराट कोहली (Virat Kohli) जितका त्याच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूने टीम इंडियाच्या खेळाडूला हुल देण्याचा प्रयत्न जरी केला, तरी विराट तडक त्यात उडी घेतो. विराट आता कर्णधार राहिला नाही. मात्र त्याचा आक्रमकपणा हा तितकाच कायम आहे. विराटचं हे आक्रमक रुप आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय (Team India vs South Africa 1st Odi ) सामन्यात पाहायला मिळालं. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमा (Temba Bavuma) यांच्यात हमरीतुमरी पाहायला मिळाली. (ind vs sa 1st odi team india virat kohli and south africa captain temba bavuma controversy at boland park paarl)
नक्की काय आणि कधी झालं?
हा सर्व प्रकार आफ्रिकेच्या बॅटिंगच्या वेळेसे 36 व्या ओव्हरदरम्यान घडला. यूजवेंद्र चहल बॉलिंग टाकत होता. या ओव्हरदरम्यान टेम्बाने कव्हरच्या दिशेने फटका मारला. तिथे विराट होता. विराटने वेगाने चेंडू स्ंटप्सच्या दिशेने थ्रो केला.
विराटने वेगात फेकलेला चेंडू टेम्बाच्या तोंडाजवळून गेला. टेम्बा थोडक्यात वाचला असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. टेम्बा यानंतर विराटकडे पाहून काहीतरी पुटपटला. विराट संतापला. विराटने टेम्बाला चोख प्रत्युत्तर दिलं. हा व्हीडिओ व्हायरल झालाय.
दरम्यान पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव झाला. आफ्रिकेने दिलेल्या 297 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 265 धावाच करता आल्या. या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.