तिरुवनंतपुरम : टीम इंडियाने (Indian Cricket Team) पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर (India vs South Africa, 1st T20I) 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.    (ind vs sa 1st t20 team india win by 8 wickets against south africa at greenfield international stadium suryakumar yadav and k l rahul both scored unbeaten fifty)


सूर्या-केएलची विजयी भागीदारी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी  107 धावांचे माफक आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या जोडीने तिसऱ्या विकेट्ससाठी नाबाद  93 धावांची विजयी भागादीर केली.



टीम इंडियाकडून केएल राहूलने 56 बॉलच्या मदतीने 4 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर  सूर्यकुमारने 33 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्ससह सर्वाधिक नाबाद 50 धावा केल्या. तर आफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्तजे या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.  


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.


दक्षिण अफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), राइली रूसो, डेविड मिलर, एडन मार्करम, ट्रिस्टन स्टब्स, वेन पर्नेल, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, तबरेज शम्सी आणि केशव महाराज.