सेंचुरियन : टीम इंडियाने आफ्रिका दौऱ्याची सुरुवात (India Tour Of South Africa) विजयाने केली आहे. विराटसेनेने आफ्रिकेचा पहिल्या कसोटी सामन्यात (India Vs South Africa 1st Test) पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने आफ्रिकेवर 113 धावांनी मात केली आहे. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत  1-0 ने आघाडी घेतली आहे. (ind vs sa 1st test day 5 team india beat south africa by 113 runs and win maiden match at Centurion) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आफ्रिकेला 191 धावांवर रोखले. यासह भारताने विजय साकारला. 


सेंचुरियनमधील पहिला विजय 


टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय ठरला. सुनील गावसकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी यासारख्या दिग्गजांनी टीम इंडियाचं कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व केलं. मात्र आतापर्यंत यााधी कधीही टीम इंडियाला सेंचुरियनमध्ये (Centurion) विजय मिळवता आला नव्हता. 
 
मात्र टीम इंडियाने कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातच ही किमया करुन दाखवली. टीम इंडियाने याआधी सेंचुरियनमध्ये 2 कसोटी सामने खेळले होते. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 


केएलचं शतक आणि शमीचा 'पंच'


उपकर्णधार सलामीवीर केएल राहुल (K L Rahul) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हे दोघे या विजयाचे शिल्पकार ठरले. केएलने सामन्यातील पहिल्या डावात शतक ठोकलं. केएलने एकूण 260 चेंडूत 130 धावांची खेळी केली. तर शमीने आफ्रिकेच्या पहिल्या डावात 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.