India vs South africa 1st test : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA Test) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. सेंच्युरियनमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी आता टीम इंडियाची रोहित अँड कंपनी (Rohit Sharma) साऊथ अफ्रिकेत पोहोचले आहेत. सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची खरी कसोटी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोन स्टार सलामीवीर फलंदाजांना संधी दिली खरी, पण रोहितसोबत कोण फलंदाजीला येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दोन सामन्यात दोघांना संधी दिली जाण्याची शक्यता होती. मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यातील कोणत्या खेळाडूला संधी मिळणार? यावर देखील चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीला पुन्हा मैदानात पहायला मिळेल का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


कशी असेल संभाव्य प्लेइंग इलेव्हन?


रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.


विराटची घरवापसी...!


क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सुद्धा दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. कौटुंबिक कारणास्तव तो तडकाफडकी भारतात आल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे प्रिटोरियातील तीन दिवसांच्या इंट्रा-स्क्वॉड गेममध्येही तो सहभागी होऊ शकला नाही, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे तो पहिली टेस्ट खेळणार की नाही? यावर अद्याप स्पष्टोक्ती मिळाली नाही.


भारताचा कसोटी संघ (IND vs SA Test squad) : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (WK)


भारताचं दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक


26 ते 30 डिसेंबर, पहिला कसोटी सामना, सेंचुरियन.
3 ते 7 जानेवारी, दूसरा कसोटी सामना, जोहानसबर्ग.