IND vs SA 2nd ODI: श्रेयस अय्यर नाबाद, तर ईशान किशनची तुफानी खेळी, साऊथ आफ्रिकेवर मिळवला मोठा विजय
नवे पण छावे! टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत मालिकेत बरोबरी साधली
रांची : दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट आणि 25 बॉल राखत दक्षिण आफ्रिकेवर (south africa) मोठा विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या (team india) विजयाचा शिल्पकार श्रेयस अय्यर (shreyas iyer) आणि ईशान किशन (ishan kishan) ठरला आहे. या विजयासह टीम इंडियाने (team India) मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. (ind vs sa 2nd odi shreyas iyer century ishan kishan half century team india big win against south africa)
दक्षिण आफ्रिकने (south africa) दिलेल्या 279 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची (team india) सुरुवात चांगली झाली नव्हती. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) ओपनिंगला उतरले होते. मात्र दोघेही टीम इंडियाला (team India) चांगली सुरुवात करून देऊ शकले नाही. त्यानंतर उतरलेल्या श्रेयस अय्यर (shreyas iyer) आणि ईशान किशनने (ishan kishan) डाव सावरला. ईशान किशनने तुफान फलंदाजी करत टीम इंडियाची वाटचाल विजयाच्या दिशेने नेली. मात्र तो सेंच्युरी मारण्यापासून हूकला. तो 84 बॉलमध्ये 93 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 4 फोर आणि 7 सिक्स मारले.यानंतर मैदानात असलेल्या श्रेयस अय्यरने सामन्याची एक बाजू शेवटपर्यंत कसून धरली होती.
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटरची मैदानात चिटींग? VIDEO आला समोर
श्रेयस अय्यरने (shreyas iyer) 111 बॉलमध्ये 113 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 15 फोर मारले. यासोबत संजू सॅमसमने 30 धावा ठोकल्या. श्रेयस अय्यरच्या नाबाद आणि ईशान किशनच्या मोठया खेळीने टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिकेने दिलेले बलाढ्य आव्हान खुपच छोट ठरलं. आणि टीम इंडियाने सहज हे आव्हान पुर्ण करत 7 विकेट आणि 25 बॉल राखत मोठा विजय मिळवला.
दरम्यान टीम इंडियाने (team india) मिळवलेल्या या मोठ्य़ा विजयाने मालिका 1-1 ने बरोबरीत आली आहे. आता तिसरा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे.