नवी दिल्ली : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याला (IND vs Sa 2nd  T20I) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाला बॅटिंग करावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने भारताला प्रथम फलंदाजी दिली आहे.


भारतीय संघाचा कर्णधार ऋषभ पंतने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या सामन्यात खेळलेल्या खेळाडूंवरच त्याने विश्वास व्यक्त केला आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या संघात २ बदल


दक्षिण आफ्रिका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. क्विंटन डी कॉक आणि ट्रस्ट सबस्टन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. डी कॉकच्या जागी हेनरिक क्लासेन आणि सबस्टनच्या जागी रीझा हेंड्रिक.


दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : 


रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (सी), रस्सी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन (वि.), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, तबरीझ शम्सी


टीम इंडिया की प्लेइंग इलेव्हन  :
ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर)  ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर,  हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान.