IND vs SA 2nd T20I : भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये दुसरा T20 सामना गुवाहटीच्या मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता दुसरा सामना जिंकून मालिका खिश्यात घालण्याचं लक्ष्य टीम इंडियाचं असेल. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी अफ्रिकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. आधी के एल राहुल (KL Rahul) आणि नंतर सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तुफान फटकेबाजी करत 237 धावांचा डोंगर उभा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात चांगली राहिली. रोहित शर्मा आणि के एल राहुलने धुंवाधार फलंदाजी करत अफ्रिकन गोलंदाजांना लोळवलं. राहुलने 28 बॉलमध्ये 57 धावांची खेळी केली. तर सुर्यकुमार यादवने फक्त 22 बॉलमध्ये 61 धावा केल्या. सुर्यकुमार बॉटिंग करत असताना तो आज शतक करेल, असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) आणि सुर्यकुमारमध्ये धाव घेताना कॉल चुकला.


नेमकं काय झालं?


इनिंगचं 18 वी ओव्हर सुरू होती. तोपर्यंत भारतीय संघाच्या 209 धावा झाल्या होत्या. मैदानावर विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव खेळत होते. साऊथ अफ्रिकेची नवी बुलेट गन म्हणून ओळखला जाणारा अॅनरिच नॉर्जिया (Anrich Nortje) बॉलिंग करत होता. पहिल्या बॉलवर कोहलीने बॉल पाँईंटच्या दिशेने मारला. मात्र, त्याठिकाणी कर्णधार बावूमा फिल्डिंग करत होता. कोहलीने पाँईंटच्या दिशेने मारला थ्रो बावूमाने नॉन स्टाईकरच्य़ा दिशेने थ्रो केला.


कोहलीने बॉल पाँईटच्या दिशेने थ्रो केल्यानंतर कोहलीने रन कॉल नाकारला, मात्र सुर्या तोपर्यंत हाफपिचपर्यंत पोहोचला होता. मात्र, बावूमाच्या थ्रोमुळे सुर्या स्टंपपर्यंत पोहोचला नाही. कोहलीने इशाराने सुर्याची माफी देखील मागितली. मात्र, रनआऊट झाल्याने नेमकी चूक कोणाची?, असा सवाल आता सोशल मीडियावरून विचारला जात आहे.


IND Vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानात घुसला साप, पळापळ झाल्याचा Video Viral


पाहा व्हिडीओ-



दरम्यान, सुर्याने कॉल दिला असताना देखील कोहली पळाला नाही, असं काहींचं म्हणणं आहे. तर सुर्या त्याच्या शतकासाठी पळत होता, असं काही नेटकऱ्याचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर सध्या या रनआऊटमुळे वातावरण तापलं आहे. व्हिडीओ  (suryakumar yadav ran out Video) पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कोणाची?