India vs South Africa 3rd Odi: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली (Arun Jethali Stadium) मैदानावर होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 World Cup ची तयारी करत आहे. टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू या स्पर्धेत खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार होता, परंतु हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत आपलं स्थान निर्माण करू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Asia Cup 2022 मध्ये रवी बिश्नोई टीम इंडियाचा भाग होता. या स्पर्धेतही त्याने जबरदस्त गोलंदाजी केली, पण T20 World Cup 2022 साठी त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं आहे. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही तो संघाच्या प्लेइंग 11 चा भाग बनला होता, पण या सामन्यात त्याने 4 षटकात 69 धावा दिल्या. रवी बिश्नोईने टीम इंडियासाठी आतापर्यंत 10 T-20 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत.


रवी बिश्नोई टीम इंडियातून 'आऊट'


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने मोठा निर्णय घेतला. या सामन्यात त्याने युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवला. मालिकेतील शेवटच्या सामन्यातही त्याला खेळणे कठीण असल्याचं दिसतंय. रवी बिश्नोई काही काळापासून टीम इंडियाची पहिली पसंती होती. मात्र, आता बिश्नोईला संघात स्थान मिळणं अवघड झालंय.


आगामी T20 World Cup 2022 साठी रविचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) आणि यजुवेंद्र चहलला (Yuzi Chahal) संघात स्थान देण्यात आलंय. आर आश्विनला संघात स्थान देण्यात आल्याने बिश्नोईला स्टँडबायच्या यादीत ठेवण्यात आलं आहे. मात्र, मागील काही सामन्यातील त्याचं प्रदर्शन पाहता बिश्नोईला संघात स्थान मिळेल की नाही?, यावर अद्याप सस्पेंन्स कायम आहे.


आणखी वाचा - टी-20 विश्वचषकाआधीच भारत-पाक सामन्याचं स्कोरकार्ड व्हायरल