विशाखापट्टणम : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्याला (ind vs sa t20i series) संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने (Temba Bavuma) पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. (ind vs sa 3rd t20i south africa win toss and temba bavuma elect to bowl first see boath team playing eleven)


टीम इंडिया अनचेंज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे. यामुळे आजच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची अधिक शक्यता होती. मात्र कॅप्टन रिषभ पंतने टीममध्ये कोणताच बदल केला नाही. 


मालिकेच्या दृष्टीने निर्णायक सामना


मालिकेच्या दृष्टीने तिसरा सामना निर्णायक आहे. आफ्रिका मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी आज कोणत्याही परिस्थितीत विजय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात कोण जिंकणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : 


ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.


दक्षिण अफ्रीका प्लेइंग XI 


टेम्बा बावुमा (कप्तान), रीजा हेंड्रिक्स, रस्सी वॅन डेर डूसन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पार्नेल, कगिसो रबाडा,  केशव महाराज,  एनरिच नॉर्तजे आणि तबरेज शम्सी.