Team India : रिषभ पंतच्या नेतृत्वात रोहितच्या लाडक्या खेळाडूकडे वांरवार दुर्लक्ष
टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) या खेळाडूमध्ये आश्वासक सुरुवात मिळवून देण्यात हातखंडा आहे. तसेच तो बॉलिंगही करतो.
मुंबई : केएल राहुलला दुखापत झाल्याने ऋषभ पंतला (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. टीम इंडियाला आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अशातच दुसऱ्या बाजूला युवा क्रिकेटर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची वाट पाहतोय. रोहित शर्माच्या नेतृत्वात या खेळाडूला सातत्याने संधी मिळत होती.
(ind vs sa 3rd t20i team india captain rishabh pant not give chance to venketesh iyer in series against south africa)
वेंकटेश अय्यर
कॅप्टन पंतने आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यात कोणतेच बदल केले नाहीत. त्यामुळे वेंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) पहिल्या 2 सामन्यात संधी मिळाली नाही. वेंकटेशचा आश्वासक सुरुवात मिळवून देण्यात हातखंडा आहे. तसेच तो बॉलिंगही करतो.
रोहित शर्माकडून संधी
रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या नेतृत्वात वेंकटेशला सर्वाधिक वेळा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली. वेंकटेशने आतापर्यंत 11 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. वेंकटेन या 11 पैकी 9 सामन्यात रोहितच्या कॅप्टन्सीत खेळला आहे. तर 2 सामने केएल राहुलच्या नेतृत्वात खेळला आहे.
पंड्याच्या कमबॅकमुळे टेन्शन वाढलं
टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) पासून ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीममधून बाहेर आहे. टीम इंडियात वेंकटेश त्याची जागेवर दावेदारी निर्माण करत होता. मात्र तितक्यात हार्दिकची एन्ट्री झाली.
पंड्याच्या एन्ट्रीमुळेही वेंकटेशला डच्चू मिळतोय. अय्यरने 9 टी 20 सामन्यात 113 धावा केल्यात. सोबतच 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर 2 वनडेमध्ये 24 रन्स केल्या आहेत.