विशाखापट्टणम :  मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SA 3rd T20I) जोरात कमबॅक केलंय. पहिल्या 2 सामन्यात अपयशी ठरलेल्या ऋतुराजने तिसऱ्या सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी केली आहे. ऋतुराजने चौफेर फटकेबाजी करत आपल्या टी 20 कारकिर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक साजरं केलं. ऋतुराजने अवघ्या 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. (ind vs sa 3rd t20i team india young opener ruturaj gaikwad scored maiden half century against south africa)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतुराजने या फिफ्टीमध्ये 6 फोर आणि 2 खणखणीत सिक्स खेचले. विशेष म्हणजे ऋतुराजने या 6 पैकी 5 फोर हे सलग फटकावले. 


अर्धशतक पूर्ण झाल्यावर ऋतुराजला मोठ्या खेळीची संधी होती. मात्र त्याला त्या संधीची सोनं करता आलं नाही. ऋतुराजने एकूण 35 बॉलमध्ये  7 फोर आणि 2 सिक्ससह 57 रन्सची खेळी केली.   


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : 


ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल.


दक्षिण अफ्रीका प्लेइंग XI 


टेम्बा बावुमा (कप्तान), रीजा हेंड्रिक्स, रस्सी वॅन डेर डूसन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पार्नेल, कगिसो रबाडा,  केशव महाराज,  एनरिच नॉर्तजे आणि तबरेज शम्सी.