केपटाऊन : टीम इंडियाला (Team India) तिसरा कसोटी सामना जिंकून पहिल्यांदा आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी होती. मात्र आता विराटसेनेचं हे स्वप्न भंगलं आहे. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. आफ्रिकेने विराटसेनेवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह आफ्रिकेने 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली आहे. (ind vs sa 3rd test day 4 south africa beat team india by 7 wickets and win series at newlands capetown)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान आफ्रिकेने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आफ्रिकेकडून कीगन पीटरसनने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. कर्णधार डीन एल्गरने 30 रन्स केल्या. 


दक्षिण आफ्रिका | डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर आणि लुंगी एन्गिडी.


टीम इंडिया : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.