इंदौर : विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक येत्या T20 वर्ल्डकप टीम इंडियाचा भाग आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम या जागतिक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. स्पर्धेपूर्वी खेळाडू पर्थमध्ये ट्रेनिंग कॅपचा भाग बनले आहेत. यानंतर काही सराव सामनेही खेळवले जातील. दरम्यान, रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान हा व्हिडीओ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्याचा आहे. 


इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T20 सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा 49 रन्सनी दारूण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन विकेट्सवर 227 धावांची मोठी धावसंख्या उभारली. 


भारतीय टीमने 18.3 ओव्हर्सच्या 178 रन्सवर ऑलआऊट झाला. दिनेश कार्तिकने निश्चितपणे प्रयत्न केले आणि 46 रन्सतं योगदान दिले. त्याने 219 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. कार्तिकने 21 बॉल्समध्ये चार फोर आणि तब्बल सिक्स मारले.


डगआउटमधील व्हिडिओ व्हायरल


या पराभवानंतर टीम इंडियाचा डगआऊटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भारताच्या पराभवानंतर डगआउटमध्ये उपस्थित असलेला दिनेश कार्तिक टाळ्या वाजवू लागला. हे करत असताना कार्तिकसोबत कर्णधार रोहित शर्मा उपस्थित आहे. त्यानंतर रोहितने मस्करी करत दिनेश कार्तिकच्या पाठीवर थाप मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.



भारताने टी-20 मालिका जिंकली


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन सामन्यांची T20I मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही T20 सामने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली. याआधी टीमने टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता टीम इंडियाच्या नजरा 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपवर आहेत.