IND Vs SA : भारतीय संघात पुन्हा मोठा बदल, दुखापतग्रस्त दीपक चहरऐवजी `या` खेळाडूला संधी मिळाली
वेगवान गोलंदाज दीपक चहरला उर्वरित दोन सामन्यांमधून वगळण्यात आलं आहे
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa) पहिल्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान घोट्याला दुखापत झाल्यामुळे वेगवान गोलंदाज दीपक चहरला (Deepak Chahar) मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून वगळण्यात आलं आहे. चहरच्या जागी आता एका धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. हा खेळाडूही दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर पडला होता. दीपक चहर 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा देखील एक भाग आहे. (India vs South Africa 2nd Odi)
दुखापतग्रस्त दीपक चहरच्या जागी संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) संधी मिळाली आहे. वॉशिंग्टन सुंदर मालिकेतील उर्वरित 2 सामन्यांसाठी टीम इंडियाचा भाग असेल. वॉशिंग्टन सुंदरही गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंज देत होता. आयपीएल 2022 दरम्यान सुंदरला दुखापत झाली होती. यानंतर तो बरा झाल्यानंतर सामना खेळायला गेलेल्या वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) तिथेही त्याच्या नशिबाने साथ दिली नाही आणि त्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे तो ऑगस्टमधील झिम्बाब्वे दौऱ्यातूनही बाहेर पडला होता. मात्र आता पुन्हा त्याला संधी मिळाली आहे.
वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्तम खेळ केला आहे. सुंदरने भारतीय संघासाठी 4 कसोटी सामन्यात 265 धावा आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर चार एकदिवसीय आणि 31 टी-20 सामनेही खेळले गेले आहेत. टी-20 सामन्यांमध्ये सुंदरने (Washington Sundar) फलंदाजीत 47 धावा आणि गोलंदाजीत 25 विकेट घेतल्या आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यातून त्याची बाहेर पडणे टीम इंडियासाठी मोठ्या झटक्यापेक्षा कमी नव्हता.
भारत एकदिवसीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर.