पार्ल : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून वनडे सिरीज खेळली जातेय. पहिल्या वनडे सामन्यात भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला तीन सामन्यांची मालिका जिंकायची असेल, तर आज फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यामध्ये केएल राहुलच्या कर्णधारपदाचीही कसोटी लागणार आहे. त्यामुळे यावेळी टीममध्ये दुसऱ्या वनडेसाठी काही बदल होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज दुसरी वनडे पार्ल मैदानावर खेळली जाणार आहे. पहिली वनडे जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतल्याने दुसऱ्या वनडेत टीम इंडियासाठी विजय खूप महत्त्वाचा आहे. कदाचित टीम इंडियाला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हे 3 मोठे बदल करण्याची शक्यता आहे.


वेंकटेश अय्यरला बाहेरचा रस्ता


पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती मात्र तो अपयशी ठरला. त्यामुळे व्यंकटेश अय्यरला वगळता सूर्यकुमार यादवला सहाव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. सूर्यकुमार चांगली फलंदाजीही करतो. सूर्यकुमार यादव एकट्याने टीम इंडियाला सामना जिंकून देऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या वनडेत सूर्यकुमार यादवची जागा निश्चित मानलं जातंय.


दीपक चाहरला संधी


पहिल्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारला साजेशी कामगिरी करता आली नाही. या खेळाडूची कामगिरी इतकी खराब झाली की पहिल्या वनडेत भारताला दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे भुवनेश्वर कुमारच्या जागी दीपक चहरला संधी दिली जाऊ शकते. गेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 10 ओव्हरमध्ये 64 धावा दिल्या. शिवाय त्याला एकंही विकेट मिळाली नाही. त्यामुळे भुवनेश्वरला बाहेरचा रस्ता दाखवण्याची येण्याची शक्यता आहे.


श्रेयस अय्यरला वगळणार


पहिल्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर अवघ्या 17 रन्सवर बाद झाला. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कोसळली. टीम इंडियाला पाचव्या क्रमांकावर अशा फलंदाजाची गरज आहे, जो संघाला शेवटपर्यंत टिकू शकेल. त्यामुळे दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरला टीममधून वगळण्याची शक्यता आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते.