INDvsSA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. रांचीमधील या सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस हरला, कर्णधार केशव महाराजने बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. या टॉसच्या वेळी असं काही घडलं की  दोन्ही संघाचे कर्णधारही अवाक झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय घडलं? 
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार केशव महाराज टॉससाठी आले. त्यावेळी समालोचक संजय मांजरेकर आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ देखील तिथं होते. ज्यावेळी टॉस उडवायचा होता तेव्हा मुरली कार्तिकने टॉस कोणाकडे आहे असं विचारलं. त्यावेळी तिघेही एकमेकांच्या तोंंडाकडे पाहत राहिले.


 



जवागल श्रीनाथ यांनी त्यांच्या खिशामधून टॉस काढला आणि हसत हसत म्हणाले, अरे टॉसच काढला नव्हता त्यानंतर केशव महाराजने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी आपल्या संघांमध्ये दोन बदल केले होते. रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांच्या जागी शाहबाज अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर यांना स्थान देण्यात आलं. 


नियमित कर्णधार टेम्बा बावुमा या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी केशव महाराजला दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.