मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 19 जानेवारीपासून वन डे सीरिज सुरू होत आहे. कसोटी सीरिजमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 वन डे सीरिज खेळवण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी मालिकेतील पराभव विसरून भारतीय संघाला केएल राहुलच्या नेतृत्वाखाली नव्याने सुरुवात करायची आहे. नव्या कर्णधाराच्या आगमनाने संघात बदल होण्याची शक्यता आहे. शिखर धवन केएल राहुलसोबत ओपनिंग करेल. त्याचबरोबर संघाकडे मधल्या फळीत अनेक मजबूत फलंदाज आहेत. 


संघात तीन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव या तीन नव्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते. 


ऋतुराज गायकवाड कमी बॉलमध्ये जास्त धावा काढण्यात माहीर आहे. तर अय्यर पीचवर सांभाळून आणि परिस्थितीचा आढवा घेऊन खेळतो. ऋतुराज गायकवाडने घरच्या मैदानात कामगिरी चांगली केली आहे. त्यामुळे या तिघांनाही जर खेळण्याची संधी दिली तर संघाला चांगला फायदा होऊ शकतो. 


आता दुसरीकडे प्रश्न असा आहे की फक्त दोन किंवा एकच जर या तिघांपैकी निवडायचा असेल तर श्रेयस अय्यर आणि त्यानंतर ऋतुराज गायकवाड असं प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे के एल राहुल नेमकी काय स्ट्रॅटजी आखणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


भारतीय संघ- केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि नवदीप सैनी.