मुंबई : टीम इंडियासाठी एक खेळाडू वारंवार व्हिलन ठरत आहे. गेल्या काही दिवसांत विराट कोहली पाठोपाठ आता ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत वाईट ठरली आहे. त्यामुळे टीमचं मोठं नुकसान होत आहे. त्याला टीम इंडियामध्ये प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी देऊ नये असंही काही क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतची खराब कामगिरी पाहायला मिळाली. ऋषभ पंतची कर्णधारपदी नियुक्ती करून निवडकर्त्यांनी मोठी चूक केल्याचं दिसत आहे. पंतऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारपद द्यायला हवे तो अशी चर्चा आहे. हार्दिक पांड्याने नुकतीच गुजरातला आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली.


ऋषभ पंत आपल्या खराब कामगिरीने टीम इंडियाची नाव बुडवत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋषभ पंतला केवळ 29 धावा करता आल्या. यानंतर दुसऱ्या टी-20 सामन्यात ऋषभ पंत अवघ्या 5 धावा करून बाद झाला.


ऋषभ पंत अत्यंत वाईट कामगिरी करताना दिसत आहे. आयपीएलमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. यात के एल राहुल दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे टीमचं नेतृत्व पंतकडे देण्यात आलं आहे. पंत सध्या एवढा फ्लॉप आहे की त्याला टीम इंडियाचं कर्णधारपद देणं ही मोठी चूक असल्याचं आता निवड समितीला वाटत असावं. 


पंत ऐवजी दिनेश कार्तिकची कामगिरी आयपीएलमध्ये चांगली करत आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या सीरिजसाठी पंतचा पत्ता कट होऊ शकतो. पंतला आता अजून तीन सामने आपली चांगली कामगिरी दाखवण्याची संधी आहे. नाहीतर पुन्हा एकदा त्याची जागा धोक्यात येऊ शकते.