K L Rahul | टीम इंडियाला मोठा धक्का, कॅप्टन केएल आणि कुलदीप मालिकेतून बाहेर
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20i Series 2022 ) यांच्यात उद्यापासून (9 जून) 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
मुंबई : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20i Series 2022 ) यांच्यात उद्यापासून (9 जून) 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा हंगामी कॅप्टन केएल राहुल (K L Rahul Injurey) आणि कुलदीप यादव हे दोघे दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत. बीसीसआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (ind vs sa t 20i series 2022 team india captain k l rahul and kuldeep yadav ruled out due owing to injurey)
नक्की काय झालं?
केएल राहुलच्या उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेतून बाहेर पडला आहे. तर कुलदीप यादव काल संध्याकाळी नेटमध्ये फलंदाजी करताना उजव्या हाताला मार लागला. त्यामुळे कुलदीपला आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत खेळता येणार नाही.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
मॅच तारीख ठिकाण
पहिला सामना 9 जून दिल्ली
दुसरा सामना 12 जून कटक
तिसरी मॅच 14 जून वायझॅग
चौथा सामना 17 जून राजकोट
पाचवी मॅच 19 जून बंगळुरु
टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.
टीम इंडिया
केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.