मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी 20 सामन्यांच्या सीरिजमधील 2 सामने टीम इंडियाने गमावले आहेत. आता उर्वरित 3 सामने जिंकण्याशिवाय टीम इंडियाकडे पर्याय नाही. पुढचाही सामना हातून गेला तर टीम इंडियाला या सीरिजमध्ये मोठा फटका बसेल. दक्षिण आफ्रिका 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करणं अत्यावश्यक आहे. ज्यामुळे पुढचा सामना टीमला जिंकण्यासाठी फायद्याचं ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

के एल राहुल दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर गेला. त्यामुळे ओपनिंगची जबाबदारी ऋतुराज गायकवाडवर आली. ऋतुराज गायकवाड आयपीएलपासून अत्यंत वाईट फॉर्ममध्ये खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो एक धाव काढून तंबुत परतला. 


ऋतुराज गायकवाडचा सलग फ्लॉप शो सुरूच आहे. त्याचा फटका टीम इंडियालाही बसला. आता ऋतुराज गायकवाडच्या जागी व्यंकटेश अय्यरला पुन्हा एकदा स्वत: ला सिद्ध करण्याची संधी दिली जाऊ शकते. 


टी 20 च्या दुसऱ्या सामन्यात आणखी एका खेळाडूनं निराशा केली. ऑलराउंडर अक्षर पटेल बॅटिंग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने केवळ 10 धावा केल्या. तर एक ओव्हर टाकून 19 धावा दिल्या आणि विकेटही मिळवली नाही. त्याचा मोठा फटका टीमला बसला. 


युजवेंद्र चहल टीमसाठी मोठा व्हिलन ठरला. त्याने आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली. मात्र टीम इंडियातून संधी मिळाल्यानंतर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 49 धावा देऊन एक विकेट काढली. तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी चहल ऐवजी रवी बिश्नोईला टीममध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.