पर्थ : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (south africa) सामन्यात टीम इंडियाचा (team india) युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने (Arshadeep Singh) चांगली कामगिरी केली. टीम इंडियाने दिलेल्या 134 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला अर्शदीप सिंहने सुरूवातीलाच दोन धक्के दिले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाची आशा उंचावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने (team india) दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला अर्शदीप सिंहने (Arshadeep Singh) मोठे धक्के दिले आहेत.अर्शदीप सिंहने दक्षिण आफ्रिकेची दोन महत्वपुर्ण विकेट काढले. अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकला बाद केले. त्यानंतर त्याने रिले रोसोला बाद केले. अशाप्रकारे त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन महत्वपुर्ण विकेट घेतल्या. 


 हे ही वाचा : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात कोहलीचा 'विराट' विक्रम, जाणून घ्या 


याआधी अर्शदिप सिंहने (Arshadeep Singh) वर्ल्ड कपच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मोठी विकेट घेतली होती.या विकेटसह अर्शदिप सिंहने वर्ल्ड कपमध्ये चांगली सुरूवात केली होती. तसेच अर्शदिपने त्याच्या कोट्यातील दुसऱ्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. अर्शदिप सिंहने अनुभवी बॅटसमन मोहम्मद रिझवानला कॅच आऊट केले होते. या दोन विकेटनंतर पाकिस्तान बॅकफुटला टाकले होता. या त्याच्या महत्वपुर्ण विकेटनंतर टीम इंडियाला पाकिस्तानविरूद्ध मोठा विजय मिळवता आला होता. 


दरम्यान हाच अर्शदिप (Arshadeep Singh) आशिया कपमध्ये विलन ठरला होता. कारण त्याने आशिया कपमध्ये पाकिस्तान विरूद्ध सामन्यात कॅच सोडली होती. या घटनेनंतर त्याला खलिस्तानी आणि गद्दार म्हणत ट्रोल करण्यात आले होते. अर्शदिपच्या विकिपिडीयामध्ये देखील खलिस्तानी असा उल्लेख करण्यात आला होता.या घटनेनंतर प्रकरण चांगलेच तापले होते. 


खलिस्तानी आणि गद्दार म्हणणाऱ्या या सर्व ट्रोलर्सना आता पुन्हा एकदा त्याने करारा जवाब दिला आहे. त्याने पाकिस्ताननंतर आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात उत्कृष्ट बॉलिंग करत ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे.