T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात कोहलीचा 'विराट' विक्रम, जाणून घ्या

विराट सिर्फ नाम ही काफी है! फक्त 12 धावा केल्या, तरीही मोठा रेकॉर्ड 

Updated: Oct 30, 2022, 07:24 PM IST
T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात कोहलीचा 'विराट' विक्रम, जाणून घ्या  title=

पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup) टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराटने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात विजयाची भूमिका बजावली होती. त्यानंतर नेदरलँडस् विरूद्ध देखील त्याने अर्धशतकी खेळी केली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (south africa) सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने निव्वळ 12 धावाच केल्या आहेत. या इतक्या धावा करून सुद्घा त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हा रेकॉर्ड काय आहे ते जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : पाकिस्ताननंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध Arshdeep Singh ची कमाल

जवळपास अडीच वर्षे विराट कोहली (virat kohli) धावांसाठी झगडत होता. त्याच्या शतकांचा देखील दुष्काळ संपतच नव्हता. मात्र आशिया कपमध्ये तो फॉर्ममध्ये परतला. त्याने शतक ठोकून पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. त्यानंतर आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 world cup) देखील तो चांगली कामगिरी करतो आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला गरज असताना विराट कोहली (virat kohli) मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तो फक्त 12 च धावा करून बाद झाला. निव्वळ 12 धावा करून सुद्धा त्याने एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

रेकॉर्ड काय?   

विराट कोहली (virat kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (south africa) 12 धावा पूर्ण करताच, तो T20 विश्वचषक (t20 world cup) स्पर्धेत भारतासाठी 1000 धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यामुळे त्याने हा मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या आता 1001 धावा आहेत. तसेच विराट कोहलीशिवाय (virat kohli) रोहित शर्मा हा भारताचा एकमेव फलंदाज आहे जो 1000 धावांच्या जवळ आहे. रोहितने 33 डावात 919 धावा केल्या आहेत.

दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळला जात असलेला वर्ल्ड कप कोहलीसाठी (virat kohli) चांगलाच ठरला आहे. कारण कोहलीने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो मोठी खेळी करू शकला नाही, तो अवघ्या 12 धावा करून बाद झाला होता. या सामन्यात टीम इंडियाने 9 विकेट गमावून 133 धावा केल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेसमोर (south africa) विजयासाठी 134 धावांचे आव्हान असणार आहे.