पर्थ : IND VS SA T20 World Cup टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा (Team India) पुढील सामना 30 ऑक्टोंबरला म्हणजेच रविवारी दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) होणार आहे. हा सामना पर्थ क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमके हे काय बदल असणार आहेत, या संदर्भात टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर (Vikram Rathour) यांनी पत्रकार परिषदेत उत्तरे दिली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : अशी असेल टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग XI, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि Match Prediction


प्लेइंग इलेव्हनबाबत काय म्हणाले? 


विक्रम राठोर (Vikram Rathour) यांना पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (South Africa) प्लेइंग इलेव्हनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, पर्थची खेळपट्टीही दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला साथ देईल, असे मानले जात आहे. मात्र भारताकडे चार वेगवान गोलंदाज आहेत. आतापर्यंत त्याने खेळपट्टी पाहिली नाही आणि खेळपट्टीची पाहणी केल्यानंतरच प्लेइंग इलेव्हनबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. 


राहूल की ऋषभ?


पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत की लोकेश राहुल (KL Rahul vs Rishabh Pant) कोणाला संधी दिली जाईल, या प्रश्नावर विक्रम राठोर म्हणाले, सध्या सलामीच्या जोडीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही आहे. लोकेश राहुलऐवजी आम्ही ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेणार नाही आहोत. त्यामुळे पर्थमध्ये फक्त लोकेश राहुल खेळणार आहे. पंतला संघाने तयार राहण्यास सांगितले असून लवकरच संधी दिली जाईल, असेही ते म्हणाले आहेत. 


हे ही वाचा : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यापुर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला मोठा इशारा


जास्त धावा करण्यावर भर


विक्रम राठोर (Vikram Rathour) पुढे म्हणाले की, जर टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करायची असेल तर पर्थमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचे लक्ष्य असेल. आम्ही स्वत:ला अशाप्रकारे तयार करतो आहे की, खेळाडूंना धावा करायच्या आहेत आणि आम्ही त्यात चांगली कामगिरी करत आहोत, असे ते म्हणाले. तसेच संघ पर्थला सरावासाठी आला होता, जेणेकरून परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.


हे ही वाचा : BCCI नव्या अध्यक्षांनी कोहलीवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले...'विराटला काहीही...'


पावसामुळे अनेक सामन्यांचा निकाल उलट लागला आहे. त्यामुळे अनेक बलाढ्य टीमला त्याचं मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे हवामानामुळे कमी षटकांच्या सामन्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, संघ पूर्ण क्षमतेने तयारी करत आहे.


दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आतापर्यंत भारत सध्या दोन सामन्यांत 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय नोंदवले आहेत. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वे विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला.तर गेल्या सामन्यात त्यांनी बांगलादेशचा 104 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे संघ गुणतालिकेत 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) हा सामना जिंकल्यास गटातील अव्वल स्थान मजबूत होईलच, यासोबतच सेमी फायनलमधला प्रवेश देखील जवळपास निश्चित होणार आहे.