पर्थ : IND VS SA T20 World Cup ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया (Team India) चांगलीच फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग दोन विजय मिळवून पॉईटस् टेबलमध्ये टॉपच स्थान गाठलंय. आता टीम इंडियाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (India vs South Africa) असणार आहे. या सामन्यापुर्वी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिनी (Roger Binny) यांनी मोठं विधान केलं आहे. त्याच्या या विधानाची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यात उत्कृष्ट खेळी केली. या त्याच्या खेळीचे टीम इंडियासह (Team India) इतर संघाच्या दिग्गज खेळाडूंक़डून कौतूक होत आहे. त्यात आता विराट कोहलीच्या कामगिरीवर बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले रॉजर बिन्नी?
टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय खेळी केल्यानंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी कौतुक केले आहे. रॉजर बिन्नी म्हणाले की, विराट कोहलीला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी त्यांचे योगदान पुरेसे असल्याचे त्यांनी म्हटलेय. रॉजर बिन्नी शुक्रवारी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) तर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
हे ही वाचा : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यापुर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला मोठा इशारा
रॉजर बिन्नी (Roger Binny) पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानविरुद्ध कोहलीची फलंदाजी पाहणे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते. कोहली ज्या पद्धतीने फटके मारत होता ते कौतुकास्पद आहे. पाकिस्तानविरुद्ध हा मोठा विजय होता,असे त्यांनी म्हटले आहे.
रॉजर बिन्नी (Roger Binny) विराटबाबत (Virat Kohli) पुढे म्हणाले की, “कोहलीला काहीही सिद्ध करण्याची गरज नव्हती. तो वेगळ्या वर्गाचा खेळाडू आहे आणि त्याच्यासारखे खेळाडू दबावाच्या परिस्थितीत चमकू शकतात, ते दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करतात, अशी स्तुतिसुमने त्यांनी उधळली.
दरम्यान येत्या 30 ऑक्टोंबरला म्हणजेच रविवारी टीम इंडियाचा (Team India) तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना पर्थ क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियासाठी सेमी फायनलचा रस्ता आणखीण सोप्पा होणार आहे. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे.