IND vs SA : रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग XI
रोहित शर्माने टॉस जिंकत हा निर्णय घेतला,अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग XI
पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (t20 World Cup) आज टीम इंडियाचा (team india) तिसरा टी20 सामना दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता पर्थच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉस टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) जिंकला आहे. हा टॉस जिंकत त्याने बॅटींगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया किती धावांचा डोंगर उभा करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रोहित शर्माने (Rohit sharma) टॉस जिंकत त्याने बॅटींगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिका प्रथम बॉलिंग करणार आहे. आता टीम इंडिया किती धावांचा डोंगर उभा करते व त्यांना रोखण्यात साऊथ आफ्रिका किती यशस्वी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. अक्षर पटेल यांच्या याच्या जागी दीपक हुड्डाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर दक्षिण आफ्रिकेत देखील एकच बदल करण्यात आला आहे. तबरेझ शम्सीच्या जागी लुंगी एनगिडी परतला आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया शानदार फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला होता. यानंतर नेदरलँडचा दणदणीत पराभव केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकून टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये धडक मारायची आहे.
टीम इंडिया संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रोसो, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि एनरिक नॉर्टजे.