जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs SA 2nd Test) टीम इंडियाच्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Chetehswar Pujara) हे दोघेही दबावात होते. सातत्याने मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरत असल्याने त्यांच्यावर हा दबाव होता. दोघेही या सामन्यातील पहिल्या डावात अपयशी ठरले. त्यानंतर सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांच्यासह अनेक दिग्गजांनी सामन्यातील दुसरा डाव हा दोघांच्या कसोटी कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरेल, असं म्हंटलं. (ind vs sa team india vs south africa 2nd test form is temporary class is permanent its true for me and ajinkya rahane says chetshwar pujara)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या दोघांनी दुसऱ्या डावात निर्णायक क्षणी शतकी भागीदारी केली. तसेच दोघांनी वैयक्तिक अर्धशतकंही लगावली. या दोघांनी केलेल्या अर्धशतकामुळे टीम इंडियाला आफ्रिकेला सन्मानजनक विजयी आव्हान देता आलं.        


दरम्यान पुजाराने या खेळीनंतर म्हणीची आठवण करुन दिली. "फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमानंट (form is temporary class is permanent). ही म्हण रहाणे आणि माझ्यासाठी चपखळपणे लागू होते", असं पुजारा म्हणाला.  


दुसऱ्या डावात हे दोघे जेव्हा खेळायला आले तेव्हा टीम इंडिया अडचणीत होती. तसेच या दोघांवर चांगली खेळी करायचा दबाव होता. वैयक्तिक खेळीसह टीमला अडचणीतून सावरण्याचं दुहेरी आव्हान या दोघांसमोर होतं. मात्र या दोघांनी 111 धावांची शतकी भागीदारी केली. या दोघांच्या या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले.   


पुजारा गावसकरांच्या वक्तव्याबाबत काय म्हणाला? 


तुमच्या दोघांवर दबाव होता का, कारण गावसकर म्हणाले होते की तुमच्या दोघांसाठी दुसरा डाव हा निर्णायक असू शकतो. अशा प्रश्न पुजाराला विचारण्यात आला. यावर पुजारा खेळ संपल्यानंतर म्हणाला, "आम्हाला स्वत:वर विश्वास आहे. टीम मॅनेजमेंटचा पाठिंबा आहे. आम्ही नेहमीच सुनील गावसकर यांच्याकडून शिकत असतो. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोललोय, तेव्हा ते नेहमीच आम्हाला समर्थन देत असतात", असं पुजारा म्हणाला.        


"हो, अशी ही वेळ येते जेव्हा तुम्ही आऊट ऑफ फॉर्म असता. या वेळेस तुमच्या खेळीवरुन प्रश्न उपस्थित केले जातात. पण आम्हाला आत्मविश्वास आहे. मी अंजिक्य खेळासाठी कसून सराव करतोय. एक म्हण आहे, फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमानंट. ही म्हण आम्हाला चपखळपणे लागू होते", असंही पुजाराने नमूद केलं.