IND vs SA Test : मोहम्मद शमीनंतर ईशान किशन टीममधून आऊट, `या` खेळाडूला लागली लॉटरी
IND vs SA, Ishan Kishan : टी-ट्वेंटी आणि वनडेनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्यांची (Team India Test squad) मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाईल.
Ishan Kishan withdrawn from Test squad : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) याने वैयक्तिक कारणांचा हवाला देत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून (Team India Test squad) मुक्त करण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केली आहे. त्यानंतर इशान किशनचं नाव कसोटी संघातून काढून घेण्यात आलंय. इशानच्या जागी आता केएस भरतची संघात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला (Indian Cricket Team) तिसरा धक्का बसल्याचं बोललं जातंय. याआधी दोन खेळाडूंना बाहेर पडावं लागलंय.
इशान किशनच्या आधी टीम इंडियाचे दोन खेळाडू मालिकेतून बाहेर झाले आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे, तर मोहम्मद शमी (Mohahmad Shami) हा टेस्ट मालिकेतून बाहेर झाला आहे. टीम इंडियासोबत कसोटी मालिकेवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप असतील.
टी-ट्वेंटी आणि वनडेनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.
कसोटीसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), प्रसीद्ध कृष्णा, केएस भरत.