मुंबई : टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात (IND VS SL 1ST T 20I)  विजयी सलामी दिली आहे. रोहितसेनाने श्रीलंकेवर 62 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 137 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (ind vs sl 1st t20i team india beat sri lanka by 62 runs at lucknow)
 
श्रीलंकेकडून चरिथ असलंकाने सर्वाधिक नाबाद 53 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त काही खेळाडूंना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वेळीच रोखलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाकडून वेंकटेश अय्यर आणि भुवनेश्वर कुमार या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहल आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी प्रत्येकी एका खेळाडूला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. 


दरम्यान या मालिकेतील दुसरा टी 20 सामना 26 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका विजयाची संधी आहे. तर श्रीलंकेसाठी ही दुसरी मॅच 'करो या मरो'ची असणार आहे. 


मालिकेच्या दृष्टीने हा सामना निर्णायक असणार आहे. त्यामुळे आता या दुसऱ्या सामन्याकडे टीम इंडियाचं लक्ष असणार आहे.   


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, हार्दिक पटेल, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमराह आणि यूजवेंद्र चहल. 


श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : पथुम निसानका, कामिल मिशारा, चरित असलंका, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कॅप्टन), चमिका करुणारत्ने, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुशमंथा चमीरा आणि लाहिरु कुमारा.