Rohit Sharma | `हिटमॅन`चा तो एक इशारा अन रोहित शर्मा कॅप्टन्सीच्या पहिल्या सामन्यात व्हिलन ठरला
श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोची सामन्यात कॅप्टन रोहित शर्माचा तो निर्णय तुम्हाला योग्य वाटला का?
मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना सुरू आहे. मोहाली इथे हा सामना खेळवला जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी साामन्यात टीम इंडियाने पहिला डाव 574 धावांवर घोषित केला.
टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक नाबाद 175 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने जड्डू 175 धावांवर असताना कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव घोषित केला. रोहितच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
रोहितने हा निर्णय घेतल्याने रवींद्र जाडेजा आपल्या द्विशतकापासून 25 धावा दूर राहिला. रोहितने जाडेजाच्या द्विशतकानंतर डाव घोषित करायला हवा होता, असं नेटीझन्सचं म्हणणं आहे.
श्रीलंकेविरूद्धची पहिली विराट कोहलीसाठी त्याच्या कारकिर्दीतील 100 टेस्ट मॅच आहे. भारताकडून 100 टेस्ट सामने खेळणारा विराट 12 खेळाडू आहे. दरम्यान या ऐतिहासिक सामन्यात विराट कोहलीने नवा आणि मोठा पल्ला गाठला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 8 हजार रन्स करणारा विराट सहावा भारतीय खेळाडू बनला आहे.
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.