अंपायरची फिरकी घेणं टीम इंडियाच्या खेळाडूंना पडणार महागात?
अरे पीछे देखो पीछे...LIVE मॅचमध्ये टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी घेतली अंपायरची फिरकी
मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सीरिज सुरू आहे. धर्मशाळा इथे दुसरा टी 20 सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. आतापर्यंत टीम इंडियाने टी 20 सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे.
सामन्या दरम्यान खेळाडू कधी आपला आनंद हटके पद्धतीनं साजरा करतात तर कधी गमतीजमती करताना कॅमेऱ्यात कैद होतात. पहिल्या सामन्यात जडेजाचा पुष्पा स्टाईलनं सेलिब्रेशन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सामन्यात बऱ्याचदा रिषभ पंत मजा किंवा फिरकी घेताना दिसतो. मात्र त्याची कसर इतर खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भरून काढल्याचं पाहायला मिळालं. सामना सुरू असताना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि स्पिनर कुलदीप यादव अंपायरची फिरकी घेत होते.
सिराज आणि यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळत नसतानाही त्यांनी अशा प्रकारे अंपायरची फिरकी घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दहाव्या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा फलंदाज चरिथ असलंकाला LBW आऊट केलं. फील्ड अंपायर जयारामन मदनगोपाल यांनी फलंदाज आऊट असल्याचं सांगितलं. नक्की तो आऊट झाला की नाही पाहण्यासाठी DSR चा निर्णय घेण्यात आला.
मॅचमध्ये DSR चा निर्णय येत असताना ब्रेक सुरू होता. त्यामुळे सिराज आणि कुलदीप ड्रिंक्स घेऊन मैदानात आले. त्यांनी अंपायरच्या मागून हात वर करून आऊट असल्याचं सांगितलं. हीच मजा सुरू असताना कुलदीपची अंपायरशी धडक झाली.
टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात (Ind vs SL 2nd T 20I) श्रीलंकेवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 184 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17 चेंडूंआधी पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा सलग 11 वा विजय ठरला. मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या विजयाचा हिरो ठरला.