SL vs Ind : भारत आणि श्रीलंकेमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात (ind vs sl 2nd t20) भारताचा 16 धावांनी पराभाव झाला. भारताने सामना गमावला असला तरी स्टार खेळाडू अक्षर पटेलने (Axar Patel Creat History Highest Score At Number 7 For India) 31 चेंडूत 65 धावांची धमाकेदार खेळी करत सर्वांची मने जिंकलीत. यामध्ये त्याने 6 गगनचुंबी षटकार तर 3 चौकार मारले. अक्षरने या खेळीसह इतिहास रचला आहे. (ind vs sl 2nd t20 axar patel creat history highest score at number 7 for india latest marahi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षर पटेलने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत वैयक्तिक 61 धावा केल्या. टी-20 मधे भारतासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. याआधी रविंद्र जडेजाच्या नावावर हा रेकॉर्ड होता, त्याने 2020 साली ऑस्ट्रेलियाविरूद्ध 44 धावांची नाबाद खेळी केली होती. दिनेश कार्तिकने 41 तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 38 धावा केल्या होत्या. अक्षर पटेलने या तिन्ही दिग्गज खेळाडूंना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 


श्रीलंकेच्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची गचाळ सुरूवात झाली. भारताचे आघाडीचे प्रमुख फलंदाज अवघ्या 57 धावांवर माघारी परतले. भारताचा डाव लवकर संपेल असं वाटत असताना सातव्या क्रमांकावर आलेल्या अक्षरने सूर्यकुमारच्या साथीने सामना शेवटच्या षटकापर्यंत आणला. 


सूर्यकुमार आणि अक्षर पटेल मैदानावर असताना दोघांनी सामना भारताच्या पारड्यात झुकवला होता. सामना भारत सहज जिंकेल असं वाटलं अन् सूर्या बाद झाला. दुसरा सामना खेळणाऱ्या शिवम मावीने फटकेबाजी करत सामन्यात आणखी रंगत आणली. शेवटच्या षकात भारताला जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता होती मात्र कर्णधार शनाकाने स्वत: गोलंदाजी करत अक्षर आणि मावीला बाद करत 4 धावा देत सामना खिशात घातला.