मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Shamra) कॅप्टन म्हणून नव्या इनिंगला अपेक्षापेक्षा शानदार सुरुवात झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजय मिळवून रोहितने नियमित कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. रोहितने नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून आतापर्यंत रोहितने तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाला14 सामन्यांमध्ये विजयी केलंय. (ind vs sl 2nd test team india win series rohit sharma best captaincy by in across all formats see statastic)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. यानंतर कर्णधार म्हणून पहिल्याच टी 20 मालिकेत रोहितने न्यूझीलंडचा 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. 


यानंतर वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर आली. या दौऱ्यात वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वात विंडिजला 3-0 ने क्लीन स्वीप दिला. तसेच टी 20 मालिकेतही 3-0 ने धुळ चारली. अशा प्रकारे टीम इंडियाने विंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेतील एकूण 6 सामन्यात विजय मिळवला. 


आता वेळ होती श्रीलंकेची. भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेचाही टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वात 'टप्प्यात' कार्यक्रम केला. या मालिकेतही टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम राखली. टीमने टी 20 मालिकेसोबत कसोटी मालिकेतही श्रीलंकेचा सुपडा साफ केला. यासह रोहितची कॅप्टन म्हणून टक्केवारी ही 100 टक्के कायम राहिली.