IND VS SL 3rd ODI: सामन्यात पावसाचा व्यत्यय, सामना थांबला
देशात पावसाचा कहर सुरू असताना आता भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजमध्येही पावसाचा व्यत्यय आला आहे.
मुंबई: देशात पावसाचा कहर सुरू असताना आता भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजमध्येही पावसाचा व्यत्यय आला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजमधील तिसऱ्या वन डे सामन्यात पाऊस आला. पाऊस आल्यामुळे खेळ थांबवावा लागला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये 2 सामने जिंकून टीम इंडिया आघाडीवर आहे.
तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवननं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सध्या टीम इंडियाचा स्कोअर तीन गडी गमावून 147 धावा आहे. मनिष पांडेय आणि सुर्यकुमार यादव क्रीझवर बँटिंगसाठी खेळत असताना पाऊस आल्यानं सामना थांबवावा लागला.
पृथ्वी शॉने 49 तर शिखर धवन 13 धावा करून तंबुत परतला आहे. संजू सॅमसननं 46 धावा केल्या. मनीष पांडे 10 तर सुर्यकुमार यादव 22 धावांवर सध्या खेळत आहेत. मात्र पाऊस आल्यानं खेळात व्यत्यय आला आणि खेळाचा रंग कमी झाला. आता पाऊस थांबण्याची वाट सर्वजण पाहात आहेत.
टीम इंडिया- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, संजू सैमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नीतीश राणा, हार्दिक पांड्या, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, नवदीप सैनी, चेतन सकारिया.
श्रीलंका : अविष्का फर्नांडो, मिनोड भानुका, भानुका राजपक्षे, धनंजय डीसिल्वा, चरित असलंका, दासुन शनाका (कॅप्टन), रमेश मेंडीस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, अकीला धनंजय, प्रवीण जयविक्रेमा.