IND vs SL : श्रीलंका संघाने जिंकला टॉस, कर्णधार रोहितकडून संघात मोठे बदल
तिसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी टीम इंडिया सज्ज, रोहितने प्लेइंग इलेव्हनमध्ये केले मोठे बदल
मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा टी 20 सामना आज होत आहे. धर्मशाळा इथे हा सामना होत आहे. टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजसारखंच आता टीम इंडिया श्रीलंकेची धुलाई करून क्लीन स्वीप करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. नुकताच श्रीलंका संघाने टॉस जिंकला असून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियामधून ईशान किशान दुखापतीमुळे बाहेर आहे. मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. मयंक अग्रवालला मात्र संधी मिळाली नाही. तर बुमराहला आराम देण्यात आला आहे.
ईशान किशनला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात बॅटिंग करताना ईशानच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. त्यामुळे ईशानला रुग्णालयात दाखल केलं होतं. ईशानला डिस्चार्ज मिळाला असला तरी आजच्या सामन्यात तो मैदानात खेळताना दिसणार नाही.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर) दीपक हुड्डा, रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आवेश खान, रवि विश्नोई, कुलदीप यादव