धर्मशाळा : टीम इंडियाने (Team India) विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 3rd T20I) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने लंका दहन केलं आहे. टीम इंडियाने या विजयासह श्रीलंकेला क्लीन स्पीप दिला आहे. टीम इंडियाने 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली आहे. (ind vs sl 3rd t20i team india beat sri lanka by 6 wickets ang give to clean sweep shreyas iyer shine at dharmashala)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेने विजयासाठी दिलेले 147 धावांचे आव्हान टीम इंडियाने 16.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या विजयाचा हिरो ठरला. श्रेयसने बॅक टु बॅक फिफ्टी ठोकली. 


श्रेयसने 45 चेंडूत 9 फोर आणि 1 सिक्सह नॉट आऊट 73 धावांची खेळी केली. रवींद्र जाडेजाने नाबाद 22 रन्स केल्या. दीपक हुड्डाने 21 रन्सची महत्तवपूर्ण खेळी केली. संजू सॅमसनने 18 धावांचं योगदान दिलं. तर रोहित शर्मा आणि वेंकटेश अय्यरने प्रत्येकी 5 धावा केल्या. 


श्रीलंकेकडून लहिरु कुमाराने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर दुश्मंथा चमिरा आणि चमिका करुणारत्नेने प्रत्येकी 1 विकेट घेतला. 


सलग 12 वा टी 20 विजय 


टीम इंडियाचा हा सलग 12 वा टी 20 विजय ठरला आहे. यासह टीम इंडियाने अफगाणिस्तानच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी साधली आहे. याआधी 11 वा सामना जिंकून टीम इंडियाने पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.  


दरम्यान आता टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20 मालिकेनंतर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे.  


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आवेश खान आणि रवी बिश्नोई. 
 
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : पाथुम निसांका, दनुष्का गुनाथिलाका, चरित असलंका, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे आणि लाहिरू कुमारा.