दुबई : आशिया कपमध्ये (Asia Cup) भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma)  72 धावांची तुफानी खेळी केली. या तुफानी खेळीसह त्याने टीम इंडियाच्या (Team india)  टार्गेटला 173 धावांवर पोहोचवले. रोहितने या सामन्यात कर्णधार साजेशी खेळी करत वैयक्तिकरीत्या अनेक रेकॉर्डसना गवसणी घातली आहे. नेमके हे रेकॉर्डस कोणते आहेत ते जाणून घेऊय़ात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली लवकर आऊट झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit sharma)   बॅटींगची बाजू सांभाळली.  रोहित शर्माने 41 चेंडूत 72 रन्स केल्या. या खेळीत रोहितने 5 फोर आणि 4 सिक्स मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 175 होता. आपल्या या शानदार खेळीमुळे रोहित शर्माने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.


रेकॉर्डस


  • रोहित शर्मा (Rohit sharma) 72 धावांची तुफानी खेळी करत आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरलाय.

  • आशिया कप स्पर्धेत 1000 धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

  • रोहित शर्माने 72 धावांच्या 4 सिक्स मारत आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रमही मोडला.

  • आशिया कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा 50 धावा करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.


रोहित शर्माने (Rohit sharma)  या चार रेकॉर्डना गवसणी घातली आहे. त्यामुळे त्याच्या या खेळीची सर्वत्र चर्चा होत आहे.  


दरम्यान श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी 174 धावांची गरज आहे. श्रीलंकेच्या ओपनर्सची बॅटींग पाहता टीम इंडिया सामना गमावेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय. हा सामना आता कोण जिंकतो याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागलेय.