IND vs SL : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
India vs Sri Lanka : टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (India VS Sri Lanka) पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.आता दुसरा सामना उद्या गुरूवारी 12 जानेवारी रोजी ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे.
India vs Sri Lanka Dilshan Madushanka Injury: टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (India VS Sri Lanka) पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.आता दुसरा सामना उद्या गुरूवारी 12 जानेवारी रोजी ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे. या सामन्यापुर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे.कारण दिलशान मदुशंकाला (Dilshan Madushanka) दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) ट्विट करून याबाबतची माहीती दिली आहे.
ट्विटमध्ये काय?
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) जखमी झाला आहे. त्याच्या दुखापतीबाबत श्रीलंका क्रिकेटने ट्विटरवर अपडेट दिले आहे. पहिल्या वनडे सामन्यात फिल्डींग करताना दिलशान मदुशंकाचा उजवा खांदा निखळला होता. त्यामुळे त्याला एक्स-रे आणि एमआरआयसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे हे रिपोर्टस पाहून त्याच्या उद्याच्या सामन्यातील खेळण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, असे बोर्डाने ट्विटमध्ये लिहलंय.
दिलशानची उत्कृष्ट गोलंदाजी
दिलशान मदुशंकाने (Dilshan Madushanka) श्रीलंकेसाठी टी-20 मालिकेत चांगली गोलंदाजी केली होती. त्याने 3 सामन्यात 5 विकेट घेतले होते. या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दिलशान दुसऱ्या स्थानावर होता. यानंतर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने एकच विकेट घेतली. मात्र, या सामन्यात तो थोडा महागडा ठरला होता. दिलशानने 6 ओव्हरमध्ये् 43 धावा दिल्या होत्या. आता दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळते का हे पाहावे लागणार आहे.
चमिका पुनरागमन करणार
श्रीलंकेचा दुसरा खेळाडू चमिका करुणारत्ने दुसऱ्या वनडेत पुनरागमन करू शकतो. गुवाहाटी वनडेच्या नाणेफेकीपूर्वी करुणारत्नेला दुखापत झाली होती. त्याच्या वरच्या ओठावर एक कट होता आणि आता त्याला तीन टाके पडले आहेत. पण तो दुसऱ्या वनडेत खेळू शकतो,अशी शक्यता आहे.
दिलशान मदुशंकाच्या (Dilshan Madushanka) येणाऱ्या रिपोर्टवर सर्व निर्भर असणार आहे. त्यामुळे आता त्याला दुसऱ्या वनडे सामन्यात संधी मिळते की तो संघातून बाहेर पडतो, हे आता उद्याच्या टॉस दरम्यानच कळणार आहे. दरम्यान तीन सामन्याच्या वनडे मालिकेत टीम इंडिया एक सामना जिंकून 1-0 ने आघाडीवर आहे. तर आता दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिका खिशात घालते की, श्रीलंका सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.