IND vs SL Final: Reserve Day ला पावसाने सामना रद्द झाला तर...; `या` टीमला करणार विजयी घोषित
IND vs SL Final: जर सामन्यात 17 सप्टेंबरला पाऊस पडला तर 18 सप्टेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आता रिझर्व्ह डेला देखील पाऊस पडला तर काय होणार?
IND vs SL Final: आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी फार खास आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 3 वाजता सामना सुरु होणार आहे. मात्र यावेळी या सामन्यावर देखील पावसाचं सावट असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर सामन्यात 17 सप्टेंबरला पाऊस पडला तर 18 सप्टेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यंदाचा एशिया कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. टीम इंडियाला गेल्या पाच वर्षांपासून आयसीसी टूर्नामेंट जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदाचा एशिया कप जिंकून या हा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी टीमवर आहे. मात्र अशातच आता कोलंबोमध्ये सामन्यादरम्यान पाऊस पडणार असल्याचं म्हटलं जातंय.
कोलंबोमध्ये 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता
भारत विरूद्ध श्रीलंका या टीम अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. श्रीलंकेमध्ये झालेल्या बऱ्याच सामन्यांमध्ये पावसाने व्यत्यय आणल्याचं दिसून आलं. अशामध्येच आता आजच्या सामन्यात पाऊस पडणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.
रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. AccuWeather च्या माहितीनुसार, 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तसंच सकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्याचप्रमाणे सामन्यादरम्यानही पाऊस पडू शकतो. एकंदरीत कोलंबोमध्ये 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
17 सप्टेंबर रोजी पाऊस पडला तर सामन रिझर्व्ह डेला खेळवला जाणार आहे. मात्र आता रिझर्व्ह डेला देखील पाऊस पडला तर काय होणार? एशियन क्रिकेट काऊंसिलने 18 सप्टेंबर हा रिझर्व्ह डे ठेवला आहे. जर या दिवशीही पाऊस पडून सामना रद्द झाला तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही टीम्सना संयुक्त विजेता घोषित करण्यात येणार आहे.
2002 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार होता. मात्र त्या सामन्यात देखील पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे तो रद्द करावा लागला. अखेरीस त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलेलं.
श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह