IND vs SL : रोहित-विराटला घाम फोडणाऱ्या या गोलंदाजाची श्रीलंकन संघात एन्ट्री, गौतम गंभीरला टेन्शन!
India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेसाठी नुवान तुषाराच्या जागी दिलशान मदुशंकाची संघात एन्ट्री केली आहे.
Dilshan Madushanka replace Nuwan Thushara : श्रीलंका आणि भारत (India vs Sri Lanka) यांच्या तीन टी-ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. पण मालिकेपूर्वीच श्रीलंकेला धक्क्यावर धक्के बसले आहेत. एकीकडे श्रीलंकेचा स्टार गोलंदाज दुश्मंता चमिरा (Dushmantha Chameera) तर दुसरीकडे मलिंगाचा क्लोन नुवान तुषारा (Nuwan Thushara) देखील दुखापतग्रस्त झाला आहे. अशातच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला असून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला घाम फोडणाऱ्या दिलशान मदुशंका याची श्रीलंकन संघात एन्ट्री केली.
नुवान तुषाराच्या जागी दिलशान मदुशंकाला संधी देण्यात आल्याने आता टीम इंडियाला मोठा धोका निर्माण झालाय. दिलशान मदुशंका याने टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कपमध्ये अडचणीत आणलं होतं. दिलशान मदुशंकाने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वनडे वर्ल्ड कपमध्ये आणि आशिया कपमध्ये विकेट काढली होती. भारताविरुद्ध दिलशान मदुशंकाने पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे युवा स्टार गोलंदाज म्हणून दिलशान मदुशंकाची ओळख निर्माण झाली आहे.
मुंबई इंडियन्सने देखील दिलशान मदुशंकाच्या गोलंदाजीची दखल घेऊन त्याला आयपीएल 2024 च्या ऑक्शमध्ये खरेदी केलं होतं. त्यामुळे कमी काळात दिलशान मदुशंका जगभरात नावाजला गेला होता. अशातच आता भारताविरुद्ध त्याची संघात एन्ट्री झाल्याने गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवला टेन्शन आलंय. त्यामुळे टीम इंडियाला नवा गेमप्लॅन तयार करावा लागेल.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ - चरिथ असलंका (C), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा (Injured), बिनुरा फर्नांडो.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.