एक संधी मिळायला हवी, भारताच्या या युवा खेळाडूसाठी गंभीर उतरला मैदानात!
फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संधी देण्यात यावी, गौतमने केला मागणी!
ind vs sl : नवीन वर्षाच्या सुरूवातीला 3 जानेवारीला भारताची श्रीलंकेसोबत (ind vs sl) टी-20 मालिका सुरू होत आहे. बीसीसीआयने (BCCI Team India Squad Announced) टी-20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) दिलं आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. मात्र या संघात एका फॉर्ममध्ये असलेल्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली नाही. याच खेळाडूसाठी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) मैदानात उतरला असून त्या खेळाडूला एक संधी द्यावी, अशी मागणी त्याने केली आहे. (ind vs sl indian cricket team one chance selectors gautam gambhir latest marathi news)
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) एक प्रतिभावान खेळाडू असून त्याला निवडकर्त्यांनी एकदा संधी देऊन योग्य ट्रॅकवर आणलं पाहिजे. शॉला सुधारण्यासाठी काही संधी देण्यात आल्या पाहिजेत. संघ व्यवस्थापनामध्ये निवडकर्त्यांनी फक्त संघ न निवडता त्या खेळाडूला तयार करणंही गरजेचं असल्याचं गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटलं आहे.
पृथ्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये असून कोणत्याही बॉलरचा सामना करण्याची त्यामध्ये क्षमता आहे. पृथ्वी आक्रमक फलंदाजीसाठी ओखळला जातो. आयपीएलमध्येही पृथ्वीने एकट्याच्या जोरावर सामने जिंकून दिले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पंत आयपीएलमध्ये खेळतो.
दरम्यान, पृथ्वी शॉने टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं असून 5 कसोटीत 339 धावा केल्या आहेत. एकदिवसीय 6 सामन्यांमध्ये त्याने 189 धावा केल्या आहेत. टी-20 मध्येही शॉने पदार्पण केलं होतं मात्र त्या सामन्यात तो भोपळाही फोडू शकला नव्हता.
टी-20 साठी भारतीय संघ- हार्दिक पंड्या (c), इशान किशन (wk), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.