IND vs SL: Jadeja ने या खेळाडूला दिले आपल्या आक्रमक खेळीचे श्रेय
India vs Sri lanka T20I : दुसऱ्या टी20 सामन्यात रविंद्र जडेजाने आक्रमक खेळी करत त्याचे महत्त्व दाखवून दिले. पण याखेळीचं श्रेय त्याने एका खेळाडुला दिलं.
IND vs SL : भारतीय टीममधील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) संघात परतला आणि ते ही शानदार सुरुवात करत. रवींद्र जडेजाने बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली. श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात दोन महिन्यांनंतर रवींद्र जडेजा मैदानात परतला. पण त्याची खेळी पाहून असं अजिबात वाटलं नाही. त्याची देहबोली जुन्या रवींद्र जडेजाची आठवण करून देणारी होती. (Ravindra Jadeja given credit to Rohit sharma)
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रवींद्र जडेजाने 4 ओव्हर टाकल्या ज्यामध्ये त्याने 37 धावा देत 1 बळी घेतला. पण त्याने आपल्या बॅटने देखील शानदार कामगिरी केली.
रवींद्र जडेजा बहुतेक 6-7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरतो, परंतु त्याला कर्णधार रोहित शर्माने T20I मध्ये 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले आणि त्याने कमाल केली. दुसऱ्या सामन्यात जडेजाने अष्टपैलू म्हणून अतिशय आक्रमक खेळी खेळली. ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वचषकापूर्वी या खेळाडूचे फॉर्ममध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे. जडेजाने आता त्याच्या या स्फोटक खेळीचे श्रेय कर्णधार रोहित शर्माला दिले आहे.
बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये जडेजा म्हणाला, 'मी रोहितचे आभार मानू इच्छितो, ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला, की मी तिथे जाऊन माझ्या देशासाठी धावा करू शकतो. त्यामुळे मला आशा आहे की भविष्यात जेव्हाही मला संधी मिळेल तेव्हा मी नेहमीच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.'
रवींद्र जडेजा हा त्याची किलर बॉलिंग आणि धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जडेजाने फलंदाजी करताना 18 चेंडूत 45 धावा केल्या, ज्यात 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.
अष्टपैलू रवींद्र जडेजा प्रथमच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. या क्रमांकावर फलंदाजी करताना रवींद्र जडेजा आक्रमक दिसला. जडेजा समोर गोलंदाजी करताना श्रीलंका संघाचे गोलंदाजही आपली लाईन लेंथ विसरले.